💖 लेक लाडकी योजना 2025 –
मुलींसाठी महाराष्ट्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना.
मुलगी ही घराची “लाडकी” असते, पण तिच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आर्थिक मदत करणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “लेख लाडकी योजना (Lek Ladki Yojana)” सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे व आर्थिक सहाय्य देणे.
🌸 प्रस्तावना :
मुलगी ही घराची “लाडकी” असते, पण तिच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आर्थिक मदत करणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “लेख लाडकी योजना (Lek Ladki Yojana)” सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे व आर्थिक सहाय्य देणे.
🎯 योजनेचा उद्देश :
• मुलगी जन्मल्यावर पालकांना आर्थिक मदत देणे.
• मुलींच्या शिक्षणात सातत्य राखणे.
• मुलगी शाळा सोडणार नाही यासाठी प्रेरणा देणे.
• समाजात स्त्री-पुरुष समानता वाढवणे
🎯 आर्थिक लाभ :
- मुलीचा जन्म झाल्यावर तत्काळ ५००० /- रु आर्थिक सहाय्य.
- पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यावर ४००० /- रु शिक्षणासाठी प्रोत्साहन .
- सहावीमध्ये प्रवेश घेतल्यावर ६००० /- रु सातत्य राखण्यासाठी.
- अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८००० /- रु उच्च शिक्षणासाठी.
- पदवी पुर्ण केल्यावर ७५००० /- रु मुलीच्या भविष्यासाठी एकरकमी अर्थ सहाय्य.
👩👧 पात्रता (Eligibility) :
•अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
•मुलगी जानेवारी 2023 नंतर जन्मलेली असावी (नवीन नियमांनुसार बदल होऊ शकतो).
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
•पालकांनी मुलगी व मुलगा दोघांसाठी समान शिक्षण धोरण पाळावे.
•जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते आवश्यक.
🖥️ अर्ज प्रक्रिया (Application Process) :
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. म्हणजेच या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये.
ज्या पालकांना त्यांच्या मुलीसाठी lek ladaki yojana form भरायचा असेल तर त्यांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी मध्ये, किंवा गावातील अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज भरायचा आहे.
📋 आवश्यक कागदपत्रे :
1.मुलीचे जन्म प्रमाणपत्र
2. पालकांचे आधार कार्ड
3. रहिवासी दाखला
4. उत्पन्न प्रमाणपत्र
5. बँक पासबुक प्रत
6. शाळेचा दाखला (लागल्यास)
7. पासपोर्ट साइज फोटो.
🏦 रक्कम जमा होण्याची पद्धत :
• मंजूर झाल्यावर रक्कम थेट मुलीच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
•शासकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाईल.
🌷 महत्वाच्या सूचना :
• एकाच कुटुंबातील दोन मुलींपर्यंतच लाभ मिळेल.
• सर्व कागदपत्रे खरी व अद्ययावत असावीत.
• अर्ज मंजूर झाल्यावर एसएमएस किंवा ईमेलद्वारे सूचना दिली जाईल.



0 Comments